Heart Attack : गेल्या काही काळापासून हार्ट अटॅकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अगदी लहान मुलांपासून ते तरुणांमध्ये याचा धोका वाढला आहे. अशातच आजच्या या बातमीत आपण हृदयविकाराचा धोका जास्त कधी वाढतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

उच्च कोलेस्टेरॉल, रक्तदाब किंवा मधुमेह ही हार्ट अटॅकची प्रमुख कारणे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. होय, व्हिटॅमिन डी, ज्याला ‘सनशाइन व्हिटॅमिन’ म्हणतात, हाडांच्या आरोग्यासाठी हे आवश्यक आहे, पण त्याचा हृदयाच्या कार्यावरही मोठा परिणाम होतो.

व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे संतुलन राखते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. याशिवाय, ते रक्तदाब नियंत्रित करते, रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी करते आणि हृदयाच्या कार्यक्षमतेला चालना देते. संशोधनानुसार, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका दुप्पट होऊ शकतो.

‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे शरीरावर काय परिणाम होतो?
रक्तदाब असंतुलन : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रक्तदाब अनियंत्रित होतो, ज्यामुळे हृदयावर ताण येतो.
रक्तवाहिन्यांची सूज : यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो.
कोलेस्टेरॉल वाढ : कमतरता कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू शकते.
रक्त गोठण्याचा धोका : यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
दरम्यान, हृदय निरोगी ठेवण्यासाठी केवळ रक्तदाब आणि साखर नियंत्रण पुरेसे नाही. तर ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेकडे देखील लक्ष दिले पाहिजे. तसेच संतुलित आहार, व्यायाम आणि योग्य जीवनशैलीद्वारे आपण हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो.







