शिक्रापूर : कंपनीच्या शेडमधून अज्ञात चोरट्याने केबल चोरुन नेली. ही घटना कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील मल्होत्रा केबल्स प्रा. लि. कंपनीच्या पत्र्याच्या शेडमध्ये घडली. याबाबत नरेंद्र वसंतराव चौधरी (वय ३८ रा. मातोश्री पार्क वाघोली, भावडी रोड पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीसाठी लागणाऱ्या लाखो रुपयांच्या केबल व वायर ठेवण्यात आलेल्या होत्या. कंपनीतील कामगार कंपनीतील शेडमध्ये केबल आणण्यासाठी गेले असताना त्यांना काही केबल नसल्याचे दिसल्याने त्यांनी याबाबतची माहिती कंपनी व्यवस्थापकांना सांगितली. दरम्यान कंपनी व्यवस्थापकांनी पाहणी केली असता कंपनीतून तब्बल ३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या केबल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास पोलीस हवालदार श्रावण गुपचे हे करत आहेत.