मुंबई : सीएए नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार आणि समान नागरी कायदाही येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. १९५० पासून आमच्या सगळ्या घोषणापत्रांमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडबाबत लिहले आहे.
संविधान सभेनेही देशाची संसद आणि विधिमंडळ अनुकूल असेल तेव्हा समान नागरी कायदा आला पाहिजे, असे स्पष्ट अमित शहा यांनी केले आहे.
अमित शहा पुढे म्हणाले की, नेहरू, पटेल, मौलाना आझाद यांच्या सह्या यावर आहेत, मग ते पण सांप्रदायिक आहेत का? १९६७ नंतर तुम्ही सांप्रदायीक विचार सुरू केलात,’ असा घणाघात अमित शाह यांनी केला.
पंथनिरपेक्ष राष्ट्रात सर्व धर्मियांसाठी समान कायदा पाहिजे. कायदा धर्माच्या आधारावर नको, यालाही राजकीय रंग दिला जातो. जनसंघापासून समान नागरी कायद्याबाबत आमचे आश्वासन आहे.
काँग्रेससारखा कनफ्यूज पक्ष पाहिला नाही. समान नागरी कायद्याबाबत काँग्रेसची भूमिका काय?’ असा सवालही अमित शाह यांनी विचारला.
देशाच्या साधनसंपत्तीवर गरीब, दलित, आदिवासी यांचा पहिला अधिकार आहे. गरिबांच्या घरी आम्ही पाणी, गॅस, शौचालय पोहोचवले. कोरोना संकटात रेशन दिले.
देशाच्या संसाधनांवर गरिबाचा पहिला हक्क आहे, तो हिंदू असो, मुस्लिम असो किंवा कोणत्याही धर्माचा असो, असे विधान अमित शाह यांनी केले.
दरम्यान, आमच्या राज्यात कोणालाही स्पेशल फेवर दिला जात नाही. जस्टीस फॉर ऑल अपिजमेंट फॉर नन, हे आमचे धोरण आहे. कोणावर अन्याय करणार नाही, कुणाचे लांगुलचालन करणार नाही,’ अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.
सीएए देशाचा कायदा आहे, कोरोनामुळे सीएए लागू करायला उशीर झाला, कोरोनाची स्थिती ठीक आहे. सीएए लागू होणार हे निश्चित, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले आहे.