राहूल कुमार अवचट
यवत : हिंदूहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना दौंड विधानसभा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर विचारमंच यांच्या वतीने दौंड तालुका शेतकरी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
आज सकाळी हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व मानवंदना करुन रक्तदान शिबीरास सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेकांनी रक्तदान करत अनोख्या पद्धतीने श्रध्दांजली वाहिली.
कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेले व दौंड मध्ये प्रथमच बैलांचा रॅम्प शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये तालुक्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला बैलांची कातडी, नखे, शेपटी, वाशिंगे, सक्षम, परिपुर्ण गुण यांचे परीक्षण करुन रावणगाव (नंदादेवी) येथील बापुराव नबाजी कोकणे यांच्या बैलांनी एक पाय वर करुन मालकाचे बोलणे ऐकून रसिकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकाविला.
तर यवत येथील माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य सदानंद दोरगे व शेतकरी छबन दोरगे यांच्या बैल जोडीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
प्रथम तीन विजेत्यांना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते “दौंडचा राजा” या नावाने चषक देऊन सन्मान करण्यात आला तर स्पर्धेत सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात आले. निरीक्षक म्हणून सेवा निवृत्त पशु अधिकारी डॉ.बबनराव तेजनकर यांनी जबाबदारी पार पाडली.
यावेळी डॉ. संतोष बडेकर व डॉ.अमोल नागवडे यांनी सहकार्य केले. यावेळी मुक्ताई आॕग्रानिकच्या सीमा कल्याणकर, गोदरेज अॕग्रोवेट लीचे संदिप वांझरे, स्वराज ट्रक्टर्सचे सचिन रंधवे, स्वाती ढमाले, यवत शाखा प्रमुख अशोक दोरगे, सचिन दोरगे, शुभम माळवे, प्रशांत खराडे यांसह शिवसेना पदाधिकारी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते