BRS Defeat Reasons : तेलंगणा ( हैदराबाद ) : तेलंगणात काँग्रेस ६६, बीआरएस ३७ आणि भाजपा ९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसने तेलंगणात बीआरएसचा धुवा उडवल्याच पहायला मिळत आहे. बीआरएसच्या पराभवाला मुळात बीआरएसच कारणीभूत असल्याच समजतयं. कारण दुसऱ्या राज्यात लक्ष घालून स्व:ताच्या राज्यात बीआरएसनं काँग्रेसला मोकळ राण करून दिलं होत. एवढंच नव्हे तर एआयएमआयएमनेही तीन जागांवर जिंकल्या आहेत. त्यामुळे तेलंगणात बीआरएसच्या पराभवाची चार प्रमुख कारणे आपण पाहूयात,
इतर राज्यात सत्ताविस्तारासाठी एनर्जी खर्च करणं
बीआरएस सरकारने महाराष्ट्रात सत्ताविस्तारासाठी लक्ष घातलं होते. अबकी बार शेतकरी सरकार असा नारा त्यांना महाराष्ट्रात दिला होता. त्यासाठी त्यांनी पंढरपूरला ६०० वाहनांचा ताफा घेऊन विठूरायाचे दर्शन घेतले होते. महाराष्ट्रातील ४५ हजार गावांमध्ये पक्षाचे जाळे निर्माण करण्यासाठी केसीआर यांनी कार्यक्रम जाहीर केले होते. भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएसनं विजय मिळवला होता. तर, बिडमध्येही बिआरएसनं मिळवला विजय गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीवर बीआरएसने झंडा फडकावला आहे. शशिकला भगवान मस्के या विजयी झाल्या आहेत.
काँग्रेसच्या ग्राऊंडवरच्या कामांना दुर्लक्ष
बीआरएस सरकार इतर राज्यांमध्ये आपली पाळेमुळे पसरवत असताना स्वताच्या राज्यात लक्ष घालण्यात दुर्लक्ष केले. दुसरीकडे पक्षाता विस्तार करत असताना काँग्रेस पक्ष मजबूत करत होते. त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. काँग्रेस त्यांच्या जाहीरनाम्यातून अनेकांना आकर्षित केले होते.
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मतदारांना आकर्षित करण्यात अपयश
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे, ट्रॅक्टर, विहीर, कृषिपंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन आदी शेती अवजारे मोफत देण्याचे सांगितले होते. रयतु वेदिका या योजने अंतर्गत प्रत्येक गावात रयतु वेदिका कार्यालय व त्यातून शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन देण्याचे नागरिकांना सांगितले होते. मात्र तरीही त्यांना यात यश आलेलं दिसत नाही.
कर्नाटकमधल्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं होतं. त्यामुळे काँग्रेसला नवं चैतन्य मिळालं आहे. आता तेलंगणाच्या निमित्ताने काँग्रेसला पुन्हा उभारी येण्याची शक्यता आहे. बीआरएस पक्ष २०१४ पासून सत्तेत होता. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आणि यासारख्या अनेक राजकीय कार्यक्रमांमुळे राहुल गांधींनी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात मुसंडी मारली. कर्नाटकनंतर तेलंगणात यश मिळाल्यानंतर काँग्रेसचं दक्षिणेकडील अस्तित्व मजबूत होईल.
बीआरएस ही भाजपची बी-टीम
बीआरएस पक्षाच्या आमदारांना त्यांच्याच मतदारंसघात प्रचंड विरोध होतोय. तसच, बीआरएस आणि एआयएमआयएम यांचा भाजपाला छुपा पाठिंबा असल्याचीही खुली चर्चा आहे. तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे तेलंगणातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी म्हणाल्या की, बीआरएस नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. सध्याचं राजकारण असं की आहे कधी ते आमचे आमदार घेऊन जातात तर कधी त्यांचे आमदार येथे येतात.