मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी शोधत असाल तर ही खास तुमच्यासाठी बातमी.बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कॅन्सर आणि बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र बोरीवली येथे भरती केली जाणार आहे.या नोकरीबाबत सविस्तर माहिती https://www.mcgm.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी १ एप्रिलपूर्वी अर्ज करावयाचे आहेत.
महानगरपालिकेतील ही भरती कनिष्ठ औषध निर्माला, रिसेप्शनिस्ट, टेडा एंट्री ऑपरेटर, वैद्यकीय सल्लागार, कनिष्ठ सल्लागार बालरोग, अतिदक्षता बालरोग तज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, त्वचारोग तज्ञ, मानद हृदयरोग तज्ञ, श्रवणतज्ञ (पार्ट टाइम), नर्स अशा विविध पदांसाठी ही करण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी असणारी शैक्षणिक अट पुढीलप्रमाणे.. यामध्ये वैद्यकीय संक्रमण सल्लागार पदासाठी उमेदवाराने एमडी, DNB पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत संबंधित क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला असावा. कनिष्ठ सल्लागार-बालरोग रक्तदोष कर्करोग पदासाठीदेखील एमडी, DNB पदवी प्राप्त केलेली असावी. अतिदक्षता बालरोग तज्ञ पदासाठी एम.बी.बी.एस पदवी प्राप्त केलेली असावी. मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ पदासाठी उमेदवाराने डीएनबी इन पेडियाट्रिक सर्जरी केलेली असावी. डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठीही ही भरती होणार आहे.
वैद्यकीय सल्लागार पदासाठी २,१६,००० रुपये पगार मिळणार आहे. कनिष्ठ सल्लागार पदासाठी १,५०,००० रुपये पगार मिळणार आहे. अतिदक्षता बालरोग तज्ञ १,५०,००० रुपये पगार मिळणार आहे.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी ९०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.