Breaking News मुंबई : जुलै महिन्यात अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि जीवनावर होणार आहे. (Breaking News) जाणून घ्या उद्यापासून कोणते बदल होणार याविषयी माहिती – (Breaking News)
इंधन व एलपीजीचे दर
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर बदलले जातात. या वेळी घरगुती सिलिंडरच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे एलपीजीच्या किमतींमध्ये बदल होईल. मे आणि एप्रिलमध्ये 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली होती, तर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कायम होत्या.
शूज आणि चप्पलबाबत निर्णय
1 तारखेपासून देशभरात निकृष्ट दर्जाचे शूज आणि चप्पल उत्पादन आणि विक्रीवर बंदी येणार आहे. सरकारने सांगितले की, 1 तारखेपासून देशभरात क्वालिटी कंट्रोल ऑर्डर (QCO) लागू करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानंतर देशातील सर्व फुटवेअर कंपन्यांना QCO चे पालन करावे लागेल.
जरी ही गुणवत्ता मानके फक्त मोठ्या आणि मध्यम स्तरावरील उत्पादक आणि आयातदारांसाठी लागू असतील, परंतु 1 जानेवारी 2024 पासून, लहान उत्पादकांना देखील त्यांचे पालन करणे अनिवार्य असेल. सध्या 27 फुटवेअर प्रॉडक्ट्स QCO च्या कार्यक्षेत्रात समाविष्ट आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)
इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजेच आयकर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे, त्यामुळे तुम्हाला या तारखेपूर्वी तुमचा आयटीआर (ITR) भरावा लागेल. 31 जुलैच्या आत ITR भरला नाही तर अशा परिस्थितीत तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
क्रेडिट कार्ड
1 जुलै 2023 पासून परदेशात क्रेडिट कार्डच्या खर्चावर टीसीएस (TCS) शुल्क आकारण्याची तरतूद असू शकते. याअंतर्गत, जर तुमचा खर्च 7 लाख किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला 20 टक्के TCS भरावा लागेल.
HDFC आणि HDFC बँक मर्जर
गेल्या वर्षी, भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील कर्जदार बँक आणि त्यांच्या प्रमोटर्सनी बँकेला अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि उत्पादने क्रॉस-सेल करण्यासाठी कॅप्टिव्ह ग्राहक बेसपर्यंत प्रवेश मिळावा यासाठी विलिन होण्याचा निर्णय घेतला होता.हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (HDFC) 1 जुलै रोजी HDFC बँक लिमिटेडशी 40 बिलियन मेगा मर्जर शेड्युल केलं आहे, देशातील सर्वांत मोठ्या खासगी क्षेत्रातील लेंडरला देशाच्या सर्वोच्च मॉर्गेज लेंडरबरोबर एकत्र आणलंय.
15 दिवस बँका बंद राहतील
तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर त्याआधी सुट्ट्यांची यादी नक्की पाहा.जुलै महिन्यात बँकेला (Bank) 15 दिवस सुट्या असणार आहेत. या महिन्यात अनेक सण आहेत, त्यामुळे बँका बंद राहणार आहेत.