Breaking News : पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघातून मोठी बातमी समोर येत आहे. अमोल कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, आढळराव पाटील जरी दार ठोठावत असले, इच्छुक असले, तरी त्या दाराच्या किल्ल्या आपल्याकडे असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं आहे.
खासदार अमोल कोल्हे यांचा दावा
माध्यमांसमोर एक बोलायचे आणि दुसरीकडे शरद पवार यांना भेटण्यासाठी आडूनआडून जी दारे ठोठवत आहात त्या दाराची किल्ली तर माझ्याकडेच आहे. (Breaking News) आपल्या वयाचा मान ठेऊन मी आपलं स्वागत करीनच पण राजकारणातला सुसंस्कृतपणा जपला जावा, एवढीच अपेक्षा, अशी टीकाही अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर केली.
अमोल कोल्हे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी चार वेळा तुम्हाला लोकसभेचे तिकिट दिले, तरी त्यांच्या अडचणीच्या काळात स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांची साथ सोडून निघून गेलात. दुसरीकडे २०१९ ला मला एकदाच शरद पवारांनी तिकिट दिले आणि आज अडचणीच्या काळात मी ठामपणे त्यांच्यासोबत उभा आहे, हा आपल्या दोघांमधला मुलभूत फरक आहे. (Breaking News) त्यांनी समाज माध्यमावर व्हिडिओ पोस्ट करून ही टीका केली.
खासदार आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर एका मुलाखतीमध्ये बोलताना टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा समाचार घेतला. मी माझे छंद चार चौघात उजळ माथ्याने सांगू शकतो, तुमचे छंद तसे आहेत का? असा सवाल करत कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. (Breaking News) कोल्हे म्हणाले की, माझ्या तुम्ही अभिनयाविषयी कुचेष्टा केली. अभिनय हे माझ्या चरितार्थाचे साधन आहे आणि जनतेला ठाऊक आहे माझी अमेरिकेत कोणतीही कंपनी नाही. त्यामुळे पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल अस करणं योग्य नाही.
आपल्यासारख्या वयस्कर नेत्याने राजकीय घडामोडींचा निषेध करणे अपेक्षित होते. परंतु, ज्या घटनांमध्ये आपणाला संधीसाधूपणा दिसतो, त्याचे वाईट वाटले. (Breaking News) तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात मी तुमचा प्रचार केला होता याचेही वाईट वाटले, असे म्हणत कोल्हे यांनी आढळरावांचा समाचार घेतला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : पंकजा मुंडेंची आज पत्रकार परिषद; मोठी घोषणा करणार?