सासवड: येथील वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन आज (दि.२४) करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य मु. सा. काकडे, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे ह्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी लेफ्टनंट प्रा. गजेंद्र अहिवळे, डॉ. शितल कल्हापुरे व प्रा. सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराची व्यवस्था करण्यात आली. अक्षय रक्तपेढी, हडपसर, पुणे येथील 11 डॉक्टरांनी यामध्ये सहभाग घेतला. 154 जणांच्या हिमोग्लोबिन व रक्तदाबाची तपासणी करण्यात आली. नंतर रक्तदानाच्या निकषानुसार पात्र ठरलेल्या एकूण ४९ जणांनी रक्तदान केले. शिबिरात महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना ज्यात 2 महाराष्ट्र गर्ल्स (48 कॅडेट्स), 36 महाराष्ट्र बटालियन (39 कॅडेट्स) व 3 महाराष्ट्र नेव्हल युनिट (15 कॅडेट्स) यांनी शिबिराची व्यवस्था केली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर प्रशासकीय कर्मचारी, एनसीसी छात्र, विद्यार्थी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शिबीर यशस्वी करण्यात सहभाग नोंदवला.