लोणी काळभोर, (पुणे) : संघटनेच्या व समाजाच्या सर्व लोकांना आरोग्य रक्षणाचे आश्वासन देऊन इथून पुढे हा आरोग्याचा वसा आपल्या समाजासाठी जमेल तेवढ्या माफक दरामध्ये देऊ व अशाच पद्धतीने व आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम राबवू असे प्रतिपादन विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका आदिती कराड यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा फुले नगर माळीमळा परिसरात लहुजी शक्ती सेना लोणी काळभोर व समता विचार मंच आयोजित लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीचे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्वराज हॉस्पिटल यांच्यामार्फत आरोग्य शिबिराचे तर लहुजी शक्ती सेना लोणी काळभोर व समता विचार मंचच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कराड बोलत होत्या.
महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य पूजन करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. प्रतिमापूजनांचा कार्यक्रम पार पडताच रक्तदान शिबिराचे आयोजकांनी आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांनी व तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर ग्रामपंचायत सदस्य सविता जगताप, सुनील गायकवाड, ललिता काळभोर, लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे व समता विचार मंचाचे विजय महानवर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लहुजी शक्ती सेना विजय सकट, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आनंद वैराट, पोलीस पाटील प्रियंका भिसे, लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य ललिता काळभोर, सविता जगताप, सुनील गायकवाड, नागेश काळभोर, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र काळभोर सामाजिक कार्यकर्ते नितीन जगताप, अमित काळभोर, कानिफनाथ जगदाळे, विजय बोडके, आकाश मात्रे, शिवाजी काळभोर, दत्ता शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
राहुल धेले म्हणाले, “रक्तदान ही काळाची गरज असून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या उद्देशाने आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आरोग्य शिबिरामध्ये 200 पेक्षा अधिक लोकांची तपासणी होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत आलेल्या औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य पूजन करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. प्रतिमापूजनांचा कार्यक्रम पार पडताच रक्तदान शिबिराचे आयोजकांनी आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांनी व तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चंदन कांबळे “यांच्या गायनातून समाजाचे अतिशय मनमुराद मनोरंजन व विचार प्रबोधन करण्यात आले समाजाच्या जडणघडणीसाठी ज्या महापुरुषांनी इतिहास रचला या महापुरुषांच्या इतिहासाचा शाहिरी जलसा आपल्या गायनातून त्यांनी मांडला”. या गायनाचा आनंद लुटत असताना समाजाला प्रगतीची गरज असून समाज विकासाच्या वाटेवर आहे हे त्यांनी त्यांच्या गायनातून दाखवून दिले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी समाजाचे प्रोत्साहन वाढवत असतानाच या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी हजेरी लावली. सयाजी पवार, समता विचार मंचाचे अध्यक्ष शंकर वाघमारे संस्थापक राहुल धेले, स्वप्निल शिंदे, दीपक लोखंडे, आदी उपस्थित होते.