पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानक, दौंड कार्ड लाईन, दौंड गुड्स यार्ड आणि दौंड ए कॅबिन दरम्यान नॉन इंटरलॉकिंग आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामासाठी २७ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे विभागातून धावणाऱ्या १७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सोलापूर रेल्वे विभागाने दिली आहे. यामुळे सलग सहा दिवस रेल्वे सेवेत अडचण येणार आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
सोलापूर विभागातून धावणाऱ्या या गाड्या रद्द
नांदेड-पनवेल एक्सप्रेस २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंत, पनवेल-नांदेड एक्सप्रेस दिनांक २९ जुलै ते ३१ जुलै २०२४, पुणे-सिकंदराबाद एक्सप्रेस २९, ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी, पुणे सोलापूर एक्स्प्रेस, सोलापूर- पुणे एक्स्प्रेस (१२१७०), पुणे सोलापूर (११४१७), सोलापूर- पुणे (११४१८), या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सोलापूर-दौंड मेमू, पुणे-हरंगुळ, हरंगुळ – पुणे, सोलापूर-पुणे डेमू, पुणे-सोलापूर डेमू रद्द करण्यात आली आहे. तसेच अमरावती-पुणे एक्सप्रेस २९ जुलै, सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ३० जुलै, लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद एक्सप्रेस ३१ जुलै, पुणे-अमरावती, अमरावती-पुणे एक्सप्रेस १ ऑगस्ट २०२४ रोजी, १२२२० सिकंदराबाद- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद एक्स्प्रेस, पुणे अमरावती एक्स्प्रेस, अमरावती पुणे एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सोलापूर रेल्वे स्थानकापर्यंत या गाड्या धावणार
साई नगर शिर्डी – मैसूर, वाराणसी पुणे, मैसूर-साई नगर शिर्डी, मैसूर-साई नगर हे रेल्वे श्री साई नगर रेल्वे स्थानकांवरून रात्री ११.५५ वाजता सुटण्याऐवजी सोलापूर रेल्वे स्थानकावरून ७.१० वाजता सुटणार आहे, वाराणसी- पुणे एक्स्प्रेस सोलापूर रेल्वे स्थानकांवर शॉर्टओरिजिनेट होईल आणि ही गाडी पुणे रेल्वे स्थानकांवरून सकाळी ११.२० ला सुटण्याऐवजी सोलापूर रेल्वे स्थानकावरून १४.४५ ला सुटणार आहे.