पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली आहे. भाजपने कटकारस्थान करून महाराष्ट्रातील निवडणूक जिंकली असल्याचा दावा राहुल गांधीनी केल्याने खळबळ उडाली आहे.
या अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, भाजपाने महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने जिंकली हे तुम्ही तिथे जाऊन लोकांना विचारा. आम्ही निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या मतदारांची यादी विचारत आहोत. ही यादी मागून आम्ही थकलो आहोत. पण अजूनही निवडणूक आयोग आम्हाला महाराष्ट्रातील मतदारांची यादी देत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच सर्वाधिक मोठा पक्ष ठरला. मात्र भाजपने कटकारस्थान करून ही निवडणूक जिंकली असल्याचा आरोप करत त्यांना देश आता कंटाळला आहे, बिहारच्या निवडणुकीत काय होत ते तुम्ही बघा. येणाऱ्या काळात देशात बदल घडणार आहे. लोकांची मत बदलत आहे, असा विश्वासही राहुल गांधींनी व्यक्त केला.