मुंबई : महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा आज (दि. २८) केली आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त होईपर्यंत चव्हाण यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच प्रदेश अध्यक्षांप्रमाणेच रविंद्र चव्हाण यांच्याकडे अधिकार राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
आमदार रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. चव्हाण हे डोंबिवलीतून चौथ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना संधी मिळाली नाही. तर दुसरीकडे सध्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची महसूल मंत्रीपदी वर्णी लागली आहे, त्यानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
भारतीय जनता पार्टी संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारीपदी माजी मंत्री आ. @RaviDadaChavan जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. रवींद्र चव्हाणजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.#BJP #Maharashtra #ChandrashekharBawankule pic.twitter.com/Ctga2JbIqQ
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 28, 2024