सातारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सातारा जिल्ह्यातील संघटनात्मक विस्तारामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत दिले आहेत.मंडल आणि बूथ प्रमुखांच्या निवडीनंतर जिल्हाध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार हा कळीचा मुद्दा आहे. या जिल्हाध्यक्ष पदासाठी भाजप नव्या चेहऱ्यानां संधी देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये लोकसभा संयोजक सुनील काटकर, कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते रवी पवार व दत्ताजी थोरात जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, पंचायतराज आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीत फाळके यांची नावे चर्चेत आहेत. आता भाजपकडून जिल्हाध्यक्ष पदासाठी कोणाला संधी मिळणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील यश भारतीय जनता पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळवायचे आहे.त्यामुळे संघटन बांधणीसह जुन्या निष्ठावंतांसह नव्या चेहऱ्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्या दमदार जिल्हाध्यक्षाची भाजपला नितांत गरज आहे.त्यामुळे यंदा नवीन चेहऱ्याला संधी मिळणार की भाजपचे निष्ठावंत यांना संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.