मुंबई: विधानसभा निवडणूकीमध्ये झालेल्या मानहाणीकारक पराभवातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष बाहेर पडायचं नाव घेत नसल्याचं दिसत आहे. ठाकरे गटाचे एकामागून एक दिग्गज नेते पक्षाला सोडचिट्टी देत आहेत. ठाकरे गटातील कोकणचे नेते राजन साळवी हे सध्या ठाकरे गटात अस्वस्थ दिसत आहेत. त्यांच्या रूपाने आता आणखी एक बडा नेता ठाकरे गटाला सोडचिट्टी देण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्षाचे नेते उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबायचे काही नावच घेत नसल्याचे समोर येत आहे. काल ठाणे आणि कोकणचे नेते राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री येथे खंडाजंगी झाल्याची चर्चा असताना आता ठाकरे गटाचा बडा नेता ठाकरे यांना सोडचिट्टी देणार आहे. या अगोदरच ठाकरे गटाचे धुळे जिल्ह्याचे सह संपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेच्या अनेक आंदोलनात हिलाल माळी सहभागी असायचे. त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला धुळ्यात मोठा हादरा बसल्याचे म्हटले जात आहे.