Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांना मोठा दिलासा..! वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्ण माफ ; तहसीलदारांबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयातही आता मोफत नोंदणी

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 April 2026, 16:17

पुणे : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील स्पष्ट परिपत्रक जारी करत, पूर्वी निर्माण झालेला गोंधळ दूर केला आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांसोबतच, एकाच कुटुंबातील सदस्यांनी आपसी संमतीने थेट दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केलेल्या वाटणीपत्रांनाही आता नोंदणी शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी व सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

यापूर्वी कलम ८५ अंतर्गत तहसीलदारांकडे वाटणीपत्राची प्रक्रिया केल्यास शुल्क माफ होते. मात्र अनेक नागरिक थेट नोंदणी कार्यालयात कागदपत्र सादर करत असल्याने, नियमांतील अस्पष्टतेमुळे त्यांच्याकडून शुल्क आकारले जात होते. ही बाब सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर महसूल विभागाने नव्याने स्पष्टीकरण देत दोन्ही पातळ्यांवर शुल्क माफी लागू केली आहे.

 

नवीन आदेशानुसार, वडिलोपार्जित जमिनीवर वारसा हक्क असलेल्या सर्व सहधारकांनी एकत्र येऊन वाटणीपत्र नोंदणीसाठी सादर केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या निर्णयामुळे शेतजमिनीच्या वाटणीचा खर्च कमी होईल तसेच प्रलंबित वाद मिटवण्यासही मदत होणार आहे.

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, आता तहसीलदार किंवा नोंदणी कार्यालय-दोन्हीकडेही शुल्क माफी लागू राहील.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मृतदेह जागेवरच सोडून नातेवाईकांनी काढला पळ! जीव वाचवण्यासाठी घाबरून सैरभैर पळाले; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतांना घडला विचित्र प्रकार

Sunday, 2 August 2026, 20:44

‘माझा पुतण्या पंतप्रधान होणार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या विधानाची राज्यभर चर्चा

Sunday, 2 August 2026, 19:57

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार! ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर..” तिने लग्नाला नकार देताच तरुणाचं डोकं सटकलं; भेटायला बोलावलं अन्…

Sunday, 2 August 2026, 19:15

‘तर मी एका मिनिटांत राजीनामा देईन’ दिलीप वळसे पाटलांचे थेट आव्हान; दूध भेसळ प्रकरणावरून राजकारणात खळबळ!

Sunday, 2 August 2026, 18:46

भाटघर धरण 100% भरले! 45 स्वयंचलित दरवाजांतून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Sunday, 2 August 2026, 18:32

संपूर्ण गाव बंद ठेवत यवतकरांनी घेतला वनभोजनाचा आनंद; अनेक वर्षाची परंपरा कायम

Sunday, 2 August 2026, 18:10
Next Post

Loni Kalbhor : निलेश काळभोर यांच्या जीविताला 'त्या' फरार आरोपीमुळे धोका ; शिवसेनेच्या वतीने लोणी काळभोर पोलिसांना निवेदन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.