बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि आरोपींना फाशी देण्यात यावी यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. दरम्यान आज संतोष देशमुख यांचं कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईला मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत, आज संतोष देशमुख यांचं कुटुंब फडणवीस यांची भेट घेणार होते, मात्र त्यापूर्वी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
संतोष देशमुखांचं कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आज मुंबईच्या दिशेन रवाना झालं आहे. अटल सेतू मार्गे मुंबईच्या दिशेने येत असातना, अटल सेतूवरील टोल नाक्यावर हा अपघात झाला आहे. टोलमधून बाहेर पडताना वाहन अडवण्यासाठी जे बॅरिअर बसवलेले असते त्या बॅरिअरला देशमुख यांच्या कुटुंबीयांची गाडी धडकली, सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही, सर्वजण सुखरूप आहेत. मात्र या घटनेत वाहनाचं मोठं नुकसानं झालं आहे,