अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून महायुती आघाडीवर दिसत आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे राम शिंदे आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार पिछाडीवर गेले आहेत. अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होत आहेत.
मतमोजणीला सुरुवात झाली असून प्राथमिक कलामध्ये कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे राम शिंदे आघाडीवर आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार पिछाडीवर आहेत. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रोहित पवार मैदानात आहेत तर महायुतीकडून भाजपचे राम शिंदे मैदानात उतरले आहेत.