रायगड : आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. तर काही ठिकाणी अंतिम निकाल सुद्धा जाहीर होऊ लागले आहेत. अशातच श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे विजयी झालया आहेत. तर शरद पवार गटाचे अनिल नवगणे पराभूत झाले आहेत.
अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर, 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होत आहेत. रायगडमधील श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती. आदिती तटकरे या सुनिल तटकरे यांची मुलगी आहे. त्यांचा या मतदारसंघात फार पूर्वीपासून प्रभाव आहे.