पुणे : आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पुरंदर मतदारसंघात महायुतीचे 14117 मतांनी आघाडीवर असुन महाविकास आघाडीचे संजय जगताप पिछाडीवर आहेत. तर अजित पवार गटाचे संभाजी झेंडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर, 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होत आहेत.