दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू एका मोठ्या चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीत अडकले असलायची माहिती समोर आली आहे. गुजरात पोलिसांच्या CID क्राईम ब्रँचने 450 कोटी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्याप्रकरणी भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल, राहुल तेवतिया, मोहित शर्मा आणि साई सुदर्शन यांना समन्स बजावले आहे. गुजरातस्थित कंपनीने गुंतवणूकदारांना बँकांपेक्षा जास्त व्याज देण्याचे आश्वासन दिले होते. पण, अनेक गुंतवणूकदारांनी त्यांचे व्याज न मिळाल्याने कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
नेमकं प्रकरण काय?
पॉन्झी योजनेचा सूत्रधार भूपेंद्र सिंग जाला यांच्याकडे चौकशी केल्यानंतर खेळाडूंना समन्स बजावण्यात आले आहेत. या खेळाडूंनी गुंतवलेले पैसे परत केले नसल्याची माहिती जाला यांनी दिली. सीआयडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल टीम गुजरात टायटन्सचा कर्णधार गिल याने 1.95 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. इतर खेळाडूंनी खूपच कमी रक्कम गुंतवली होती. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी गिल सध्या ऑस्ट्रेलियात असल्याने तो आल्यानंतर त्याची सीआयडी चौकशी करेल.
या घोटाळ्यात मेहता यांचा सहभाग आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सीआयडीने बँक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी टीम तैनात केली आहे. जाला यांचे एक अनधिकृत खातेही आहे. जे खातेपुस्तक जप्त करण्यात आले आहे. या संदर्भात सोमवारपासून ठिकठिकाणी छापेमारी सुरू करण्यात आली आहे.
450 कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा..
भूपेन्द्र सिंह जाला यांनी राजस्थानसह देशभरात आकर्षक गुंतवणूक योजनांचे जाळे पसरवले. कमी वेळीत जास्त व्याज देण्याचे आश्वासन देऊन पॉन्झी योजना सुरू केली. सुमारे 14 हजार लोकांनी यामध्ये गुंतवणूक केली. ज्यामध्ये सीआयडीच्या प्राथमिक तपासात जाला यांनी 6000 कोटी रुपयांची मोठी फसवणूक केल्याची माहिती समोर आली. तपास जसजसा पुढे गेला तसतशी ही रक्कम 450 कोटींवर आणल्याचे आढळून आले. याप्रकरणी छापेमारी सुरूच आहे. या घोटाळ्याची रक्कम 450 कोटींहून अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जाला यांची अनेक खाती आहेत. त्या खात्यात सुमारे 52 कोटी रुपयांच्या व्यवहारांची नोंद झाली आहे. सध्याच्या तपासाच्या आधारे घोटाळ्याची एकूण रक्कम 450 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. छापेमारी सुरू राहिल्यास हे प्रमाण वाढू शकते.