तुषार सणस
Big News भोर: शिरवळ (ता.खंडाळा) येथील रियटर इंडिया कंपनीचे ३४८ कामगार हे २६ जुलै पासून काम बंद ठेवत संपावर गेले आहेत. Big News
कंपनी सातारा जिल्ह्यात असताना कंपनी कामगारांना संप पुणे जिल्ह्यात का घ्यावा लागतो ? कामगार एकत्र येऊ नये. या साठी कंपनी व्यवस्थापन वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. फक्त दिखावा म्हणून कामगारांनी केलेला संप मिटविण्यासाठी विंग गावामध्ये ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रस्ताव केला. जो की पूर्ण कंपनीच्या संगणमतचा होता. या मध्ये काही तरी गडबड असल्याने तो कामगारांनी मान्य केला नाही. प्रस्ताव धुडकावत कामगारांनी त्यांचे आंदोलन सुरूच ठेवले आहे. Big News
कामगार एकत्र येऊ नये. फक्त कंपनी व्यवस्थापनाच्या इशाऱ्यावर उठ बस करावी. या अन्याय कारक विचाराने कंपनीला आम्हा ३४८ कामगारांची संघटना मान्य नाही. विनाकारण गुन्हे दाखल करत कामगारांमध्ये व्यवस्थापन फूट पाडत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष किरण गोळे, जनरल सेक्रेटरी योगेश खामकर, श्रमिक महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे, अध्यक्ष किशोर सोमवंशी आणि ३०० कामगार यांनी बळीराजा मंगल कार्यालय येते पत्रकार परिषद घेऊन सांगितले. Big News
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना संघटना निर्माण झाली तेव्हा पासून संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न कंपनी व्यवस्थापन करत आहे. सहा पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण व डेप्यूटेशनच्या नावावर परराज्यात ६ महिने पाठवले होते. चौकशीच्या नावाखाली कामगार निलंबित केले जात आहेत. आता पर्यंत जवळ जवळ २४ कामगारांची चौकशी सुरू असून ११ कामगारांचे कंपनीने निलंबन केले. स्थानिक पदाधिकारी कंपनीत असलेले कॉन्ट्रॅक्ट आणि सीएसआर फंडाच्या ओझ्याखाली दाबलेले हात या मुळे कंपनीचे समर्थन करण्यास त्यांना भाग आहे असा घणाघात करत आणि पदाधिकाऱ्यांनी राजकीय फायदा आणि हितसंबंध जपण्यासाठी कामगार संपास विरोध दर्शवला आहे.
कामगार हा अन्याय सहन करणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कंपनी व्यवस्थापन जर संघटनेतील कामगारांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर आम्हाला कंपनी ते मुंबई मंत्रालय पायी वारी काढत कामगारांवर होत असलेला अन्यायाचे गाऱ्हाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना भेटून सांगणार असून जो पर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाही. तो पर्यंत त्या ठिकाणी कामगारांच्या हक्का साठी आंदोलन करणार असल्याचे श्रमिक एकता महासंघ सल्लागार मारुती जगदाळे यांनी सांगितले आहे.
या आंदोलनामध्ये जिल्हा बाह्य हस्तक्षेपाबाबत होत असलेच्या आरोपाबद्दल बोलताना जगदाळे म्हणाले की. मी सातारा येथील फलटण गावचा असून, बाहेरचा कोणी हस्तक्षेप करतोय हा आरोप हास्यास्पद व केविलवाणा असल्याचे सांगत, स्थानिक प्रतिनिधींनी स्वतःच्या फायद्यासाठी कष्टकरी कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच हजारोंच्या संख्येने पर राज्यातील कामगार येऊन ८० टक्के लोक कायमस्वरूपी काम करीत असताना खंडाळा तालुक्यातील केवळ २० टक्के च्या आसपासच कामगार कंपनी मध्ये कायमस्वरूपी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
संघटना नको तर कंपनीला फक्त १४ कामगार असलेली राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार संघटना ही राजकीय पक्षाची सलग्न युनियन कशी चालते, आणि कष्टकऱ्यांची एकता मजबूत ठेवणाऱ्या श्रमिक एकता महासंघाचे कंपनी व स्थानिक पदाधिकाऱ्यांना चीड का ? असा सवालही संघटनेचे अध्यक्ष किरण गोळे यांनी केला. सीएसआर फंड, अफाट पैसा मिळवून देणारी कंत्राटे यामुळे कायमच कधी आतून तर कधी उघड उघड कंपनीचे समर्थन करणाऱ्या राजकारण्यांमुळे कामगारांना न्याय मिळेपर्यंत श्रमिक एकता महासंघ कामगारांसाठी कामगारांचे सोबत असेल.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत हा लढा मागे घेणार नसल्याचे सांगत काही अनुचित प्रकार घडल्यास केवळ कंपनी प्रशासन जबाबदार असल्याचे सल्लागार मारुती जगदाळे यांनी नमूद केले. दरम्यान याबद्दल माहिती घेण्यासाठी कंपनी प्रशासनाशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
कामगारांवर दबावतंत्राचा वापर करत.आमच्याकडून कंपनीमध्ये जास्तीचे काम करून घेतले जाते आणि आठ तासापेक्षा ही जास्त वेळ वीणा वेतन थाबविले जाते.काम न केल्यास उद्या पासून कामावर येऊ नका अशी धमकी दिली जाते. हा अन्याय फक्त संघटना नको म्हणून केला जात आहे
किरण गोळे (कामगार व युनियन अध्यक्ष)
कंपनीमध्ये संघटनेत असल्यामुळे नेहमीच काम वाढवून दिले जात होते आणि चहा पिण्यासाठी देखील उभे राहूनच चहा घ्यावा लागत होता.लघुशंका करण्यासाठी जरी ब्रेक घेतला तरी कामावर येऊ नका अशी धमकी दिली जात असल्याचे एका कामगाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे
नाव न सगण्याच्या अटी वरून (कामगार रियटर)
फक्त कामगाराची संघटना नको या मुळे ३४८ कामगारांना कंपनी व्यवस्थापन वेठीस धरत आहे. फक्त १४ कामगारांची संघटना मान्य असेल तर ती संघटना नक्की कोणाची असा प्रश्न आमच्या मनात आहे. चौकशीच्या नावाखाली कामगार निलंबित केले जात आहेत.हे कामगार आणि श्रमिक एकता महासंघ सहन करणार नाही. कामगारांवर होत असलेले अन्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कंपनी ते मुंबई मंत्रालय पायी यात्रा करत कामगारांचे गाऱ्हाणे त्यांच्या समोर ठेवणार आहे.
मारुती जगदाळे सल्लागार श्रमिक ऐकता महासंघ
कामगारांच्या मागण्या पुढील प्रमाणे
संपाची नोटीस दिल्यानंतर संघटनेचे दोन पदाधिकाऱ्यांसह ९ कामगार बडतर्फ केलेत. ती कारवाई रद्द करावी. २० कामगारांवर खोटे आरोप करत चौकशीच्या नावाखाली निलंबन केलेली कारवाई रद्द करावी.
२० कामगारांच्या बदल्या चंदीगड व कोईमतुर येते केल्या आहेत त्या रद्द कराव्यात.
कामगारांवर होणारी अन्यायकारक वागणूक थांबवावी.