पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत सहभागी हीनार असल्याची चर्चा झाली होती मात्र आताच त्यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पवारा 7 जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत चालणार अशा चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आले होते. शरद पवार म्हणाले, मी वारीत चालणार हि बातमी खोटी आहे. पुण्यातील पत्रकारपरिषदेत त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
शरद पवार म्हणाले, मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालणार ही बातमी खोटी आहे. पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते. त्या ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी मी थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार आहे.
अर्थसंकल्पावर शरद पवार म्हणाले….
यावेळी शरद पवारांनी अर्थसंकल्पावर बोलताना म्हटले आहे कि, महाराष्ट्र हे दोन नंबरचे कर्जबाजारी राज्य आहे. तुमच्याकडे खिशात काय? हे न तपासता तुम्ही बाजारात जाऊन खरेदी करायला गेलात तर काय अवस्था होते हे मी सांगायची गरज नाही. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला त्याच्यापासून धसका घेतला आहे आणि म्हणून अशाप्रकारची आखणी केली आहे. ठिक आहे, आखणी केली. तातडीने या सगळ्या गोष्टी आम्ही देणार असं जाहीर केलं. आता दिवस फार राहिले नाहीत. आता थोड्याच दिवसात वस्तुस्थिती कळेल, आम्ही त्याची वाट बघत आहोत.
भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला : शरद पवार
टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजयावर शरद पवार म्हणाले, एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका त्यांचं वेगळं स्थान होतं. अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केलं. टी ट्वेंटी विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला आहे. सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. जसपीत बुमरा सिंग आणि कुलदीप यादव चांगली कामगिरी केली. द्रविडने खेळाडूंना योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले. भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.