Big News नागपूर : आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवण्याच्या तयारीत आहे. (Big News) मध्य रेल्वे नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डूवाडी ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या चालवणार आहे. (Big News) या सर्व रेल्वे सेवांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. (Big News)
नागपूर-पंढरपूर विशेष रेल्वे
नागपूरहून 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 08.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.00 वाजता पंढरपूरला पोहोचेल. याचा गाडी क्रमांक 01207 स्पेशल असणार आहे. तर रेल्वे क्रमांक 01208 विशेष पंढरपूर येथून 27.06.2023 आणि 30.06.2023 (2 सेवा) रोजी 17.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल.
दौंड, कुर्डुवाडीसह इतर काही ठिकाणी थांबे
या रेल्वेचे अकोला, शेगाव, अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबे असणार आहेत.
नागपूर-मिरज स्पेशल
नागपूरहून 25.06.2023 आणि 28.06.2023 (2 सेवा) रोजी 08.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.55 वाजता मिरजेला पोहोचेल. या रेल्वे क्रमांक 01205 विशेष असा असणार आहे. तर रेल्वे क्रमांक 01206 विशेष मिरज येथून 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 12.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल.
हे असतील थांबे
मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे.