जळगाव : आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. तर काही ठिकाणी अंतिम निकाल सुद्धा जाहीर होऊ लागले आहेत. अशातच जामनेर मतदारसंघात महायुतीचे गिरीश महाजन विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे पराभूत झाले आहेत.
अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर, 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होत आहेत.