Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी 18 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश होणार; सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 9 October 2026, 16:15

पुणे : महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या आणखी 18 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राज्यातील 75 टक्के तालुक्यांमध्येच दुष्काळ घोषित करण्यात आला होता. यामुळे उर्वरित भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता आणि विरोधी पक्षांनीही यावरून सरकारवर टीका केली होती. अखेर वाढत्या मागणीची दखल घेत शासनाने उर्वरित 18 तालुक्यांत पंचनामे व सर्वेक्षणाचे आदेश जारी केले आहेत.

यंदाच्या मान्सूनवर ‘अल निनो’चा गंभीर प्रभाव पडल्याने राज्यात अत्यंत कमी पाऊस झाला. यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक गावांमधील धरणे, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या ग्रामीण भागात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने नांदेड, सातारा, सांगली, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांतील 18 तालुक्यांमध्ये ‘ग्राऊंड ट्रथिंग’ (थेट पाहणी) आणि 5 प्रमुख पिकांच्या 20 टक्के सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे.

नव्याने समाविष्ट केलेल्या तालुक्यांमुळे आता राज्यातील एकूण दुष्काळी तालुक्यांची संख्या 283 झाली आहे. या भागातील प्रत्यक्ष नुकसानीची माहिती घेण्यासाठी कृषी विभागामार्फत वेगाने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. तसेच, केंद्र सरकारचे एक विशेष पथकही महाराष्ट्रात दाखल झाले असून ते राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अहवाल तयार करत आहे. हा अहवाल दिल्लीत सादर झाल्यानंतर केंद्र सरकारकडून राज्याला विशेष आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

दरम्यान, दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. धरणांमधील पाणीसाठा प्राधान्याने पिण्यासाठी आणि जनावरांसाठी राखीव ठेवण्यात आला असून, उर्वरित पाणी उद्योग आणि इतर कामांसाठी दिले जात आहे. याशिवाय जनावरांसाठी चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला लवकरच थेट आर्थिक मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; बावनकुळेंची मोठी घोषणा…

Wednesday, 18 November 2026, 10:33

पुण्यात पहाटे अग्नितांडव! टिंबर मार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी; 60 दुकानं जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान!

Wednesday, 18 November 2026, 10:19

Pune News: अपघातानंतर जखमी महिलेला रुग्णालयात नेले, पण प्रकृती गंभीर असल्याचे समजताच ठोकली धूम; पोलीस कर्मचाऱ्याला अखेर बेड्या

Wednesday, 18 November 2026, 10:05

बारावी पास तरुण बनला तोतया IAS अधिकारी! पुण्यातील सोसायटीचा चेअरमन बनून केला 35 लाखांचा घोटाळा; नेमकं प्रकरण काय? वाचा

Wednesday, 18 November 2026, 9:52

तुकाराम मुंढे यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला! अडीच तोळे सोने अन् 80 हजार रुपये लंपास; नेमकं प्रकरण काय? तपासात सत्य आले समोर

Wednesday, 18 November 2026, 9:43

शिरूरमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांकडून शिक्षणाचा बाजार! बायोमेट्रिक, CCTV, प्रयोगशाळाच नाहीत; NEET-JEE साठी ऑफलाईन प्रवेश देऊन गोळा केली लाखोंची माया?

Wednesday, 18 November 2026, 9:27
Next Post

भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेचा नोबेल जाहीर ,ट्रम्प यांचं नोबेलचं स्वप्न पुन्हा भंगलं!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp