Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारावी पास तरुण बनला तोतया IAS अधिकारी! पुण्यातील सोसायटीचा चेअरमन बनून केला 35 लाखांचा घोटाळा; नेमकं प्रकरण काय? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 18 November 2026, 9:52

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात एका तरुणाने चक्क सनदी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या 21 वर्षीय तरुणाने आपण IAS अधिकारी असल्याची खोटी माहिती पसरवली. एवढेच नाही, तर आपल्या बनावट ओळखीच्या जोरावर तो सोसायटीचा चेअरमनही बनला. या पदाचा गैरवापर करून त्याने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हितेश प्रमोद कुलकर्णी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो बाणेर परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत कुटुंबासह राहत होता. सोसायटीचे खजिनदार दत्तराय नागरगोजे यांनी त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर 2026 या कालावधीत हितेशने आपण IAS अधिकारी झाल्याचा बनाव केला. सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरही त्याने नियुक्ती झाल्याची खोटी माहिती दिली. त्याच्या बोलण्यावर आणि वागण्यावर विश्वास ठेवून सोसायटीच्या सदस्यांनी त्याची चेअरमनपदी निवड केली.

यानंतर त्याने पदाचा वापर करून नागरिकांना म्हाडाच्या लॉटरीतून सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सोसायटीतील 5 रिकाम्या सदनिका मिळवून देण्याच्या नावाखाली शुल्क आणि मुद्रांक शुल्काच्या कारणास्तव नागरिकांकडून तसेच सोसायटीच्या खात्यातून 19 लाख रुपये जमा केल्याचा आरोप आहे.

याशिवाय सोसायटीच्या 37 लाख रुपयांच्या मुदत ठेवीवर परस्पर 10 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. या आर्थिक गैरव्यवहारामुळे एकूण 35 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या अपहाराचा आरोप करण्यात आला आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हितेशला अटक केली असून, या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बारावी पास तरुण बनला तोतया IAS अधिकारी! पुण्यातील सोसायटीचा चेअरमन बनून केला 35 लाखांचा घोटाळा; नेमकं प्रकरण काय? वाचा

Wednesday, 18 November 2026, 9:52

तुकाराम मुंढे यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला! अडीच तोळे सोने अन् 80 हजार रुपये लंपास; नेमकं प्रकरण काय? तपासात सत्य आले समोर

Wednesday, 18 November 2026, 9:43

शिरूरमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांकडून शिक्षणाचा बाजार! बायोमेट्रिक, CCTV, प्रयोगशाळाच नाहीत; NEET-JEE साठी ऑफलाईन प्रवेश देऊन गोळा केली लाखोंची माया?

Wednesday, 18 November 2026, 9:27

पुण्यातील महत्त्वाचा पूल दीड महिन्यासाठी बंद; ‘या’ मार्गांचा करा वापर

Wednesday, 18 November 2026, 9:07

सोन्याचा तोरा उतरला; चांदीचीही चमक फिकी! सहा दिवसांत सोन्याच्या दरात 8,300 रुपयांची घसरण; चांदी किलोमागे 25 हजारांनी स्वस्त

Wednesday, 18 November 2026, 8:33

धोनीची निवृत्ती अन् IPL 2027 मध्ये मोठे फेरबदल!10 संघांची रिटेन-रिलीज यादी आली समोर; एका क्लिकवर पाहा संपूर्ण लिस्ट

Wednesday, 18 November 2026, 8:28
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp