बीड : बीड जिल्हा सद्या खूप चर्चेत आहे. दरम्यान हवेत गोळीबार करून व्हिडीओ काढणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच परळी पोलिसांनी आज (दि.26) त्याला अटक केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता याच कैलास फडला परळी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून न्यायालयात हजर केले असताना कैलास फडला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कैलास फड याच्याकडून परवानाधारक पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कैलास फड याचा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता. हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अंजली दमानिया यांच ट्वीट काय?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी X प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, “वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत ! आणि एक पिस्तुल धारी माणूस. दाउतपुर ता.परळी येथील सरपंच कांता फड व मुलगा कुणाल फड अवैध शस्त्र बाळगून दहशत पसरवतात? वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या छत्रछायेखाली? ही तक्रार सुद्धा एसपी नवनीत कावत यांना दिली. कारवाईची अपेक्षा” दरम्यान, अंजली दमानिया यांनी ट्वीट केल्यानंतर पोलिसांकडून फड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.
ब्रेकिंग
हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता . या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात… pic.twitter.com/dlOjd5xv1k
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 24, 2024
गृहमंत्री देवेंद्र फडणीसांना अंजली दमानिया यांचे आवाहन
महाराष्ट्रातल्या सगळ्या शास्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा. जिथे गरज नाही असे सगळे शास्त्र परवाने रद्द करण्यात यावे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे गुंडांचा नाही. इन्स्टाग्रामवर अशी रिल्स दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते आहे. आपला देश असा असणार आहे का? हे देशाबद्दल व्हिजन असणार आहे का? ताबडतोब बीडमधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, असं आवाहनही दमानिया यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलं होतं.