Gold Silver Price : गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये चढ उतार दिसून येत आहे. शुक्रवारी (13 डिसेंबर) सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. आजदेखील (14 डिसेंबर) सोन्याच्या भावात घसरण झालेली दिसून येत आहे.
आज सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोने १३० रूपयांनी स्वस्त झाले आहे तर चांदी ६४० रूपयांनी स्वस्त झाली आहे. जर तुम्ही आज सोने खरेदी करायच नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण सोने चांदीचा दर जाणून घेऊ या
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७१,४६३ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७७,९६० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९१९ रुपये आहे म्हणजेच चांदी ९१,८६० रुपये प्रति किलो आहे. एक आठवड्यापूर्वी २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर ७६,७२० होता तर चांदीचा दर ९२३२० रुपये प्रति किलो होता.