पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. सुरवातीला टपाल मतमोजणी सुरु असून सुरवातीच्या कलामध्ये महायुती आघाडीवर दिसत आहे. आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे देवदत्त निकम आघाडीवर असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील पिछाडीवर आहेत. अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होत आहेत. त्यानुसार मतमोजणीला सुरुवात झाली असून प्राथमिक कलामध्ये आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे देवदत्त निकम आघाडीवर आहेत
आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षफुटीआधी देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर दोघांमध्ये अंतर निर्माण झालं. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून निकम यांना आंबेगावमधून उमेदवारी दिली आहे. मतमोजणीमध्ये सद्या देवदत्त निकम आघाडीवर आहेत.