नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार असून त्यासाठी निवडणूक आयोगाने आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार असल्याचे पत्रक जारी केले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे, हे स्पष्ट झालं आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबरला संपणार असून त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रसह झारखंडमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे.