मुंबई : शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घडामोडी दिसून आली. शेअर बाजारात घसरण दिसली. आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, मुंबई शेअर बाजाराचा (BSE) 30 शेअर्स सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी 170 अंकांनी घसरला. बाजारातील या घसरणीदरम्यान, अदानी पोर्ट्स, टायटन, झोमॅटो या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
सेन्सेक्समध्ये 630 अंकांची मोठी घसरण झाली. बुधवारी, शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आणि दुपारी 12 वाजेपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक कोसळले. बीएसई सेन्सेक्सने मागील 78,199.11 च्या बंद पातळीवरून आघाडी घेतली आणि 78,319.45 च्या पातळीवर उघडला. पण काही वेळातच निर्देशांकात मोठी घसरण सुरू झाली. निफ्टीनेही सेन्सेक्सचा मार्ग अवलंबल्याचे दिसून आले.
एकीकडे बीएसई सेन्सेक्स निर्देशांक कोसळत असताना दुसरीकडे एनएसई निफ्टीही त्याच मार्गावर पुढे सरकला. जेव्हा निफ्टी-50 बाजार उघडला तेव्हा तो 23,707.90 च्या आधीच्या बंद पातळीवरून 23,746.65 च्या पातळीवर गेला आणि काही काळ तेजीच्या रीतीने व्यवहार केल्यानंतर त्यातही घसरण सुरू झाली. बुधवारी शेअर बाजारात अचानक झालेल्या या मोठ्या घसरणीत अदानीपासून टाटापर्यंतचे शेअर्स कोसळले.
‘या’ शेअर्समध्ये दिसून आली घसरण
लार्जकॅपमध्ये एनटीपीसी, टाटा मोटर्स, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक रेडमध्ये होते, तर मिडकॅपमध्ये, भेल, टाटा एलक्सी, आरती इंडस्ट्रीज, बायोकॉन, गोडिजिट, व्होल्टास, लुपिन, पॉलिसी बाजार. 2-4 टक्क्यांनी घसरण दिसून आली.