Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : थार गाडीचा अपघात, मग घरातून विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण , लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत चार जणांना ठोकल्या बेड्या

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 6 April 2025, 11:51

लोणी काळभोर: फिरायला जाण्यासाठी दिलेल्या थार गाडीचा अपघात झाल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची घटना एकाद्या सिनेमातील पटकथेला शोभेल अशी घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तारासिटी सोसायटीच्या परिसरात शनिवारी (ता.5) रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्याची 12 तासाच्या आत उकल करून लोणी काळभोर पोलिसांनी चार अपहरणकर्त्यांना अटक केली आहे.

भावेश प्रमोद चौधरी (वय-21), रितेश होना चव्हाण (वय-21), अभिषेक हरिदास सराटे (वय-21) व वरद विलास नखाटे (वय-21, सर्व रा. एक्सविरयों सोसायटी, हिंजवडी पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शरण गौडा (वय 24, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे, मूळ रा. विजापुर कर्नाटक) असं अपहरणातून सुखरूप सुटका करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर याप्रकरणी युवराज नरेंद्रपाल सिंग (वय 24, लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे मुळ रा. राजस्थान) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवराज सिंग व शरण गौडा हे लोणी काळभोर येथील एका शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत. तर हे लोणी काळभोर परिसरातील इमारतीत एकाच फ्लॅटमध्ये राहतात. फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी बाहेर फिरायला जायचे ठरविले होते. शरण याने हिंजवडी येथील भावेश चौधरी याची थार गाडी फिरायला जाण्यासाठी बुक केली होती. शरण व सिध्दांत हे गुरुवारी (ता.3) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गाडी आणण्यासाठी गेले होते. ठरल्याप्रमाणे थार गाडी ताब्यात घेऊन लोणी काळभोरला माघारी निघाले होते. तेव्हा सिद्धांत हा गाडी चालवीत होता.

थार गाडी घेऊन येत असताना हिंजवडी येथील एक्सविरर्या सोसाएटी मधील वळणावर एका झाडाला सिद्धांतकडून थार गाडी धडकली. या अपघातात थार गाडीचे मोठे नुकसान झाले होते. तर शरण व सिध्दांत या दोघानाही किरकोळ मार लागला होता. दोघांनीही या अपघाताची माहिती भावेश चौधरी याला दिली. तसेच गाडी त्यांच्या ताब्यात देऊन अपघातात झालेल्या नुकसानीचे खर्च देवु असे सांगितले.

 

दरम्यान, थार गाडीचा अपघात करून गाडीचे नुकसान केले आहे. तसेच अद्यापही नुकसान भरपाई न दिल्याचा राग मनात धरुन चारही आरोपी फिर्यादी युवराज सिंग यांच्या फ्लॅटवर शनिवारी (ता.५) रात्री एक वाजण्याच्या सुमारास आले. आरोपींनी फ्लॅटचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी शरण यास शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आणि शरण याचे अपहरण करून वेरणा गाडीमध्ये घेऊन गेले.

याप्रकरणी युवराज सिंग यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संगीता कलम 137(2), 333, 115, 352, 351 (2) (3), 314 (4)(5)3×5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी शरण गौडा यांची सुखरूप सुटका केली आहे. तर अवघ्या 12 तासाच्या आत चारही आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलिस उपायुक्त डॉ.राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, सर्जेराव बोबडे, पूजा माळी, पोलीस हवालदार विलास शिंदे, पोलीस अंमलदार बाजीराव वीर, शैलेश कुदळे, राहुल कर्डिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post

बारामतीत युवकास मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल ,आरोपींना ठोकल्या बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp