नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (यूआयडीएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून
भुवनेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. भुवनेश्वर कुमार हे उत्तर प्रदेश कॅडरचे १९९५ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) अधिकारी आहेत.
कुरुक्षेत्र येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे (भारतीय तंत्रज्ञान संस्था) पदवीधर आणि सुवर्णपदक विजेते असलेले
भुवनेश कुमार यांनी केंद्रात आणि आपल्या कॅडर राज्यात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासह ते भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात सहसचिवपदावरही काम केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागात प्रधान सचिव म्हणून काम पाहिले आहे.