भिगवण: भिगवण (ता. इंदापूर) येथे २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या (Bhigwan News) सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू (Pune Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात सचिन भगवान गजरमल (वय ३२ वर्षे, मूळ राहणार खेड, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर व सध्या राहणार अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी दिपाली सचिन गजरमल (वय २० वर्षे, व्यवसाय मजुरी) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गजरमल हे भिगवण गावच्या हद्दीत हॉटेल सागरजवळून सोलापूर–पुणे लेन क्रॉस करून पुणे–सोलापूर लेनकडे डिव्हायडर ओलांडत प्रभू मेडिकलकडे येत असताना, पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी शिवशाही एसटी बस (क्रमांक MH 06 BW 4410) यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. या धडकेत सचिन गजरमल यांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्थानिक नागरिक व बसचे मालक संतोष शिवाजी सोळके यांनी जखमी सचिन गजरमल यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर, भिगवण येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी बसचालक झाकीर महंमद शेख (वय ४१ वर्षे, रा. वाहीरा, ता. आष्टी, जि. बीड) याने भरधाव वेगात, निष्काळजीपणे व रहदारी नियमांचे उल्लंघन करून बस चालविल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला. सदर अपघाताचा पुढील तपास हवालदार लोडी हे करीत आहेत







