Bhigvan News भिगवण : भिगवण ग्रामपंचायतीने गावातील विविध विकासकामे करत असताना अवलंबलेल्या ऑनलाईन ओपन टेंडर पद्धती मुळे लाखो रुपयांची बचत झाली आहे. Bhigvan News) त्यामुळे ग्रामपंचायतीचा आर्थिक फायदा होत आहे. (Bhigvan News)
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून विकासकामे मंजूर झालेली असून येथील वार्ड क्र. ३ मधील उमाकांत रायसोनी घर ते यादव वकील घर रस्ता या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ४९ हजार ९ हजार ८४० रुपये असून सदरचे काम अंदाजपत्रकीय दरापेक्षा – १८.५० टक्के कमी दराने मंजूर झाले आहे. या कामामध्ये ९२ हजार ४७१ रुपयांची बचत झाली आहे.
भिगवण येथील वार्ड क्रं ४ मधील यशोधरा हॉस्पिटल ते दीपक पवार घर रस्ता या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ३ लाख ९९ हजार ७०८ रुपये असून सदरचे काम अंदाजपत्रकीय दरापेक्षा -१८ टक्के कमी दराने मंजूर झाले आहे. या कामामध्ये ७१हजार ९४८ रुपयांची बचत झाली आहे.
भिगवण येथील दफनभूमी वॉल कंपाऊंड करणे, या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम २लाख १हजार ४५१रुपये असून सदरचे काम अंदाजपत्रकीय दरापेक्षा -१५.९७ टक्के कमी दराने मंजुर झाले आहे. या कामामध्ये ३२ हजार १७२ रुपयांची बचत झालेली आहे. असे वरील तीन विकासकामांमध्ये एकूण १लाख ९६हजार ५९१ रुपयांची बचत होऊन ग्रामपंचायतीचा आर्थिक फायदा झालेला आहे.
महत्वाची बाब म्हणजे मागील तीन ते चार महिन्यापूर्वी मंगेश खडके घर ते योगेश चव्हाण घर या ७ लक्ष रुपयांच्या रस्त्याच्या कामात देखील ऑनलाइन ओपन टेंडर पद्धतीमुळे १ लाख २२ हजार रुपयांची बचत होऊन आर्थिक फायदा झाला होता. या बचत झालेल्या रकमेतून विकासकामे होणार आहेत. हे मात्र निश्चित.
दरम्यान, एकंदरीत गेल्या सहा महिन्यांपासून ३ लाख १८ हजार पेक्षा जास्त बचत होऊन गावाचा आर्थिक फायदा झाला आहे.यामुळे भविष्यात देखील विकासकामे करीत असताना ऑनलाइन टेंडर पद्धतीचा अवलंब करण्यात यावा अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.