लोणी काळभोर (पुणे) : भारतीय जनता पार्टी लोणी काळभोर शहरच्या वतीने शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी, दृष्टी दोष तपासणी व तिरळेपणा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी दिली.
सदर शिबिराचे आयोजन मंगळवारी (ता. ११) सकाळी ९ ते ४ यावेळेत लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात आले आहे. या शस्त्रक्रियेसाठी रेशन कार्ड व आधार कार्ड आवश्यक असणार आहे.