लोणी काळभोर, (पुणे) : भारतीय जनता पार्टी लोणी काळभोर शहरच्या वतीने शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी, दृष्टी दोष तपासणी व तिरळेपणा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन भाजपाचे लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी केले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन दत्ताजी खेडेकर संघचालक छत्रपती संभाजी नगर यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्वागत शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी केले. सदर शिबिराचे आयोजन मंगळवारी (ता. ११) सकाळी ९ ते ४ यावेळेत लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात आले होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष जनार्दन दांडगे, किरण दुगाने, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे प्राचार्य सिताराम गवळी, लोणी काळभोर शाळा नंबर १ च्या मुख्याध्यापिका मीना नेवसे, २ च्या लता सोरटे, उद्योजक सतीश खंडेलवाल, ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत गायकवाड, नंदू काळभोर, दिलीप काळभोर, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डी.जे जाधव, डॉ. रुपाली बंगाळे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सविता वर्मा, प्रियांका ढम, शेहनाज शेख, भाग्यश्री भिकोले, श्वेता काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.