मुंबई : ज्युबिलंट भरतिया ग्रुपचे प्रमोटर असलेल्या भरतिया कुटुंबाने कोका-कोला इंडियासाठी बाटली उत्पादक कंपनी असलेल्या हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (HCCB) मध्ये 40 टक्क्यांचा हिस्सा खरेदी केला आहे. भरतिया कुटुंबाचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोका-कोला इंडियाच्या अध्यक्षांनी जुबिलंट विविध क्षेत्रातील अनेक दशकांचा अनुभव घेऊन आला आहे. आता हा करार कोका-कोलाच्या प्रणालींना गती देण्यास मदत करेल. कंपनीकडून या डीलची रक्कम उघड केलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार हा करार 10,000 कोटी रुपयांचा असेल असा अंदाज आहे. हा करार इक्विटी आणि कर्जाच्या माध्यमातून केला जाईल.
कोका-कोला इंडिया, जे ब्रँडिंग आणि इतर व्यवसायांवर लक्ष ठेवते, त्यांनी आर्थिक वर्ष 2024 मध्ये 4,713.38 कोटी रुपयांचा एकत्रित रेव्हेन्यूची नोंद केली आहे. या कालावधीत त्याचा नफा 41.82% ने घसरून 420.29 कोटी रुपये झाला. HCCBL 7 वेगवेगळ्या कॅटेगरीत 60 उत्पादने बनवते आणि विकते. त्याच्या उत्पादनांमध्ये कोका-कोला, थम्स अप, स्प्राइट, मिनिट मेड, माझा या उत्पादनांचा समावेश आहे.