Bharat Taxi App: केंद्र सरकारकडून सर्व सामान्यांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. सर्व सामान्य नागरिकांच्या प्रवासांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व सामान्य नागरिकांना परवडणारी, सुरक्षित आणि विश्वासार्ह टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. (Bharat Taxi App)

हेही वाचा- सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज…! सोन्याचा भाव आज घसरला, जाणून घ्या सविस्तर
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी आणि चालक या दोघांसाठीही फायदेशीर ठरणारे देशातील पहिले सरकारी मालकीचे टॅक्सी सेवा अॅप ‘भारत टॅक्सी’ नुकतेच सुरू करण्यात आले आहे.
वापरण्यात येणारे खाजगी अॅप्समुळे (ओला, उबर आणि रॅपिडो) या सारख्या अॅपमुळे अनेक वेळा प्रवाशांना भाडे नाकारणे, अतिरिक्त रक्कम मागणे, असभ्य वर्तन अशा समस्यां उद्भवल्या होत्या. याच गोष्टींना केंद्र बिंदू ठेऊन भारत सरकारने आपले अॅप सुरु केल आहे. प्रवाशांना पारदर्शक आणि सुरक्षित सेवा मिळावी यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
ही सेवा सध्या देशाची राजधानी दिल्ली शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून जानेवारी 2026 पर्यंत संपूर्ण देशभरात लाँच करण्यात येणार आहे. या अॅपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे झिरो कमिशन मोडेल प्रवाशांकडून मिळणारे संपूर्ण भाडे थेट चालकांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे बेरोजगारी सारखा प्रश्न आता कमी होईल आणि चालकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
आजपर्यंत 51,000 हून अधिक चालकांनी या अॅपवर नोंदणी केली आहे, हे या उपक्रमाचे मोठे यश मानले जाते.
भारत टॅक्सी सेवा ‘Co-operative Model’ वर आधारित आहे आणि सहकार टॅक्सी कॉरपरेटीव्ह लिमिटेड या बहु-राज्य सहकारी संस्थेद्वारे चालवली जाणार आहे.
हा अॅप कसा असेल
हा अॅप ग्राहकांसाठी 24/7 सेवा देईल. अॅपमध्ये वाहन ट्रॅकिंग, संपूर्ण भाडे पारदर्शकता, तसेच बहुभाषिक इंटरफेस अशी आधुनिक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर या सेवेचे सॉफ्ट-लाँच करण्यात आले आहे.






