नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात टेक्नॉलॉजी वापरली जात आहे. त्यामुळे धोका टाळायचा असेल तर सावधगिरी बाळगणे गरजेचे बनले आहे. त्यात Android मध्ये Malware आला आहे त्याच्या माध्यमातून तुमच्या कार्डची माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
सध्या एक नवीन मालवेअर असून, त्याला अँड्रॉइड मालवेअर म्हटले जात आहे. हा मालवेअर निअर फील्ड कम्युनिकेशन म्हणजेच NFC वर परिणाम करतो. हा मालवेअर फोनला संक्रमित करतो आणि पेमेंट कार्डचे तपशील चोरतो. हा मालवेअर कार्ड डेटा चोरून घेतो आणि तो गोळा करतो. त्यानंतर सायबर गुन्हेगार त्या तपशीलाचा वापर करून कार्ड क्लोन करतात, त्यानंतर लोकांची फसवणूक करण्याचे काम सुरू होते. एटीएम आणि ‘पॉइंट ऑफ सेल’ (PoS) मशिनमध्ये याचा सर्वाधिक वापर केला जातो.
या मालवेअरला Engate असे नाव देण्यात आले आहे. हा मालवेअर इतका धोकादायक आहे की, डिव्हाईसमधून चोरलेली माहिती कार्ड तपशील चोरण्यासाठी आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी वापरली जाऊ शकते. एवढा धोकादायक मालवेअर प्रथमच दिसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्याची क्षमता खूप जास्त आहे आणि ते क्लोनिंग कार्डसारखे काम करते. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे बनले आहे.