HMPV Virus : चीनमध्ये नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातल्याचे समोर येत आहे. हा व्हायरस ६ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी सर्वात घातक असल्याचे म्हटले जात आहे. नेमका कसा आहे? हा व्हायरस आणि त्यापासून तुमच्या मुलांची कशी काळजी घ्याल? त्याबाबत आपण जाणून घेऊया.
पालकांनो तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या. कारण चीनमधून आलेल्या आणि जगभरात मृत्यूचं थैंमान घालणाऱ्या कोरोनाला 5 वर्षेही उलटले नाहीत तोच आता पुन्हा एकदा चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आलं आहे. तर सरकारने चीनमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत असल्याचं स्पष्ट केलंया आहे.
लहान मुलांनाच सर्वाधिक धोका का?
- HMPV या विषाणूचे सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक
- HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो
- रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त
- मुलांना श्वास घेण्यास त्रास
- लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो
- दमा किंवा ब्रॉन्कायटिससारखा आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका
चीनमध्ये ह्यूमन मेटाप्न्युमोव्हायर या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्धांना असला तरी चीनमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत.
कसा होतो HMPV चा प्रसार?
- खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने संसर्ग
- संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग
- संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा
नेमकी काय काळजी घ्याल?
- मास्क घाला
- गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
- वारंवार हात स्वच्छ धुवा