पुणे : अनेक जण चहासोबत बिस्कीट किंवा इतर पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र जर तुम्ही चहासोबत प्लॅस्टिक खाताय असं म्हटलं तर तुम्हाला धक्का बसेल. पण , हे खरंय जर तुम्ही चहाच्या टपरीवर युज अँण्ड थ्रो कपातून चहा पित असाल तर तुम्ही चहासोबत प्लॅस्टिक खात आहेत. कारण टपरीवर चहा देण्यासाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या कागदी कपच्या आतील प्लास्टिकचं आवरण गरम चहासोबत थेट पोटात जातं. हे कसं घडतं? आज जाणून घेऊया.
चहाची सवय कॅन्सरला आमंत्रण..
- गरम चहामुळे प्लॅस्टिक वितळतं
- कागदी कपाला बीपीए केमिकलचं आवरण
- बीपीए केमिकलमुळे कॅन्सरचा धोका
- एका कपातून 25 हजार प्लॅस्टिक मायक्रॉन पोटात जातात
चहाच्या कपातून नागरिकांना कॅन्सरचा धोका असल्याने बुलढाण्यातील आझाद हिंद संघटनेनं या कपांवर बंदीची मागणी केली होती. आणि आता या चहाच्या कपांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे आदेश जारी करत बुलढाण्यात या कपांवर बंदी घालण्यात आली आहे.
वापरायला सोप्पे आणि युज अँण्ड थ्रो असणारे हे कप न कळत आपल्याला गंभीर आजाराच्या दिशेनं ढकलत नेत असतात. कॅन्सर पसरवणाऱ्या य़ा कपावर आता कडक कारवाई होणं गरजेचं असून बुलढाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला या निर्णयाची राज्यभरात अंमलबजावणी होण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.