मुंबई : HMPV व्हायरसने देशात प्रवेश केला आहे. मात्र, आता तो देशाच्या आर्थिक राजधानीतही येऊन पोहचला आहे. मुंबईत HMPV चा रुग्ण आढळल्याची माहिती समोर येत आहे.
HMPV चा एक रूग्ण मुंबईत सापडला आहे. एका ६ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसची लागण झाल्याची माहिती आहे. दरम्यान या बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे.
या गोष्टी कटाक्षाने पाळा…
– साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात धुवा.
– साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास, अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरा.
– श्वसनाच्या आजाराची लक्षणे असणाऱ्या लोकांपासून दूर राहा.
– दरवाजाची हँडल, फोन आणि काउंटरटॉप्स यांसारख्या वारंवार स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची साफसफाई करत रहा.