Bengaluru Road Accident Video : बंगळुरू : बंगळुरूमधून अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. एका अपघाताचे दृश्य सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. भरधाव एसयूव्ही कारने तीन वाहनांना धडक दिली, ज्यात चार जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार एकाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. एसयूव्हीने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार दुसऱ्या कारच्या बोनेटवर जाऊन पडला. त्याने ती कारही खूप लांबपर्यांत रेठल्याचं दिसत आहे. बंगळुरूमधील हुलीमावूजवळ झालेल्या या अपघातात एसयूव्हीने तीन दुचाकींना आणि काही चारचाकींना धडक दिली. या अपघातात पहिल्या दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला असेल अशी द़श्य आहेत.
#WATCH | A speeding car hits several people and other vehicles near the Kalena Agrahara area in Bengaluru. (12.11)
(Viral video confirmed by Police) pic.twitter.com/ZyaCPQ1Nds
— ANI (@ANI) November 13, 2023
अपघाताचे दृश्य
व्हिडीओत पाहायला मिळते की, कार सर्वप्रथम दोन मोटारसायकलला धडकते. एसयूव्ही कारने धडक देताच मोटारसायकलवरील व्यक्ती शेजारून जाणाऱ्या दुसऱ्या कारच्या बोनेटवर पडली. यादरम्यान, संबंधित व्यक्त आधी कारच्या बोनेटवर आणि नंतर दोन गाड्यांमधील रस्त्यावर पडण्यापूर्वी अनेक फूट हवेत असल्याचे दिसून आले. त्याचवेळी कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तो फूटपाथवर पडला, त्यामुळे दोन जण जखमी झाले.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, दिवाळीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी बंगळुरूमधील हुलीमावूजवळ एका वेगवान एसयूव्हीने तीन दुचाकींना धडक दिली. एसयूव्हीने तीन दुचाकींना धडक दिल्याने चार जण जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्या सर्व लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून पोलीस अधिक तपास करत आहेत.