Atul Subhash suicide case : बंगळुरु येथे आयटी कंपनीत काम करणाऱ्या अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांच्या पत्नीसह सासू आणि मेहुण्याला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. बंगळुरु पोलिसांनी पत्नी निकिता सिंघानियाला गुरुग्राम येथून तर आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांना प्रयागराज येथून ताब्यात घेतले.
नेमकं प्रकरण काय?
अतुल सुभाष याने 9 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील त्याच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने एक तासांहून अधिकचा व्हिडिओ तयार केला होता. त्यात त्याने घरातील पाच लोकांच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचा दावा केला होता. यामध्ये त्याची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा, मेव्हणा अनुराग, चुलत सासरा सुशील सिंघानिया आणि कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश रीता कौशिक यांचे नाव घेतले आहे. या लोकांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्येसाठी प्रवृत्त झाल्याचे त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितले. हाच आपल्यासमोरचा अखेरचा पर्याय असल्याचे त्याने निराशाने या व्हिडिओत सांगितले. त्यांने 24 पानाची एक सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये त्याने अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.
अतुलवरील खटला मागे घेण्यासाठी त्याच्या पत्नीने व सासरच्या मंडळींनी तीन कोटी रुपयांची मागणी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच पैसे देता येत नसेल तर जीव देऊन टाक असे देखील त्याला बोलण्यात आले होते. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांची पत्नी निकिता सिंघानिया आणि तिचे कुटुंबिय फरार झाले होते. रविवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे.
Atul Subhash suicide case | Accused Nikita Singhania has been arrested from Gurugram, Haryana. Accused Nisha Singhania and Anurag Singhania arrested from Prayagraj and produced before the court and given to judicial custody: Shivakumar, DCP White Field Division, Bengaluru… pic.twitter.com/8XxZUcwkfQ
— ANI (@ANI) December 15, 2024