पुणे : एटीएम फसवणुकीच्या अनेक घटना घडत आहे. एटीएम पैसे काढताना काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हालाही एटीएम फ्रॉड टाळायचे असेल तर या गोष्टींची काळजी घ्या.
एटीएम पिन बदलत रहा-
एटीएम पिन वेळोवेळी बदलत राहिल्यास तुमच्यासोबत फसवणूक (Fraud) होण्याची शक्यता खूप कमी होते. यावर बँक तुम्हाला सल्लाही देते. तसेच, विशिष्ट पॅटर्न किंवा तत्सम संख्यांचा पिन बनवू नका. तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबरचे अंक, 0000, 1111 सारखे अंक वापरू नका.
एटीएम सुरक्षा तपासा-
पैसे (Money) काढताना घाई करू नका. सर्वप्रथम, एटीएमच्या आतील बाजूस एक नजर टाका आणि कोणताही छुपा कॅमेरा बसवला आहे की नाही हे एका नजरेने पहा. एटीएम कार्ड स्लॉट देखील तपासा कारण स्कॅमर कधीकधी एटीएममध्ये क्लोनिंग उपकरणे किंवा कार्ड रीडर चिप्स स्थापित करतात. हे उपकरण एटीएम कार्डचा डेटा चोरते यामुळे तुम्ही फसवणुकीला बळी पडतात. अशा परिस्थितीत जर काही शंका असेल तर ते एटीएम वापरू नका.
एटीएम पिन-
पैसे काढताना एटीएम पिनचा वापर काळजीपूर्वक करा. तसेच, गुप्तपणे पिन प्रविष्ट करा. लक्षात ठेवा की, तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलात तेव्हा तेथे कोणीही नसावे. तेथे इतर कोणी असल्यास, त्याला बाहेर जाण्यास सांगा आणि संशय असल्यास, त्या एटीएममधून ताबडतोब बाहेर या.
एटीएम पिन आणि कार्ड कोणालाही देऊ नका-
घाईघाईत पैसे काढण्यासाठी अनेक वेळा आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना एटीएम कार्ड आणि पिन देतो. असे करणे अल्पावधीत सोयीचे असू शकते, परंतु दीर्घकाळात तुमची फसवणूक होऊ शकते. अशी चूक करू नका. काही कारणास्तव तुम्हाला एटीएम पिन आणि कार्ड कुणाला द्यायचे असल्यास ताबडतोब कार्डचा पिन बदला आणि बँक स्टेटमेंट पहा.