गोरख जाधव
Baramati News : डोर्लेवाडी : ओैट घटकेचा राजा असलेल्या श्री श्रीयाळशेठ राजाचा उत्सव डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी झाल्यामुळे डोर्लेवाडी परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.
डोर्लेवाडी परिसराला जत्रेचे स्वरूप
डोर्लेवाडी येथे नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ‘औट घटकेचा राजा’ अशी ओळख असलेल्या आणि तेराव्या शतकात लोकहिताचे कार्य करणाऱ्या राजा श्रीयाळ शेठचा उत्सव डोर्लेवाडी येथे मोठ्या उत्सहात साजरा करण्याची प्रथा आहे. (Baramati News) या सणानिमित्त डोर्लेवाडी येथील चौकाचौकात मित्र मंडळाकडून श्रीयाळ शेठ राजाची चार फूट उंचीची मातीची प्रतिकृती उभी केली जाते.
काळाच्या ओघात या प्रथेला काहीसे विकृत स्वरूप प्राप्त झाले. श्रीयाळ शेठ म्हणजे एक शेठजी अशी प्रतिकृती साकारण्यात सुरवात झाली. ढेरपोट्या श्रीयाळशेठ बनवून त्याच्या तोंडात चिलीम, सिगार, बिडी देऊन एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे श्रीयाळ शेठ थट्टेचा विषय बनले. (Baramati News) हे गैरसमज मोडीत काढून, आदर्श व्यक्तिमत्वाच्या स्मृती जपणारा उत्सव म्हणून हा उत्सव साजरा व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या उत्सवानमित्त संध्याकाळी गावातील सर्व जाती-धर्माच्या महिला एकत्र येतात, झिम्मा फुगडीचा फेर धरतात, पारंपारिक गाणी म्हणतात, यामध्ये प्रामुख्याने श्रीयाळ शेठची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते.
श्रीयाळ शेठ उत्सवात इच्छुकांचे शक्तीप्रदर्शन
डोर्लेवाडी ग्रामपंचायत कार्यकाळ हा जानेवारी २०२३ मध्ये संपलेला आहे व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जे उत्सुक तरुण उमेदवार आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले. ग्रामपंचायत निवडणूक केव्हाही लागू होऊ शकते. (Baramati News) त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी डीजे लावून गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न केला. डोर्लेवाडीची ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या चुरशीची असते. यावर्षी देखील ही निवडणूक मोठ्या चुरशीची होणार आहे. या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी देखील मोठे शक्ती प्रदर्शन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : सायकलला १६ आरसे अन् ८ इंडिकेटर; बारामतीतील ७५ वर्षीय अवलियाचे अनोखे सायकलप्रेम!