Baramati News : बारामती : जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करत असून महाराष्ट्र सरकार यात प्रयत्न करीत आहे. पाच ट्रिलियन कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट लवकरच गाठू शकेल. आणि ते साध्य केल्यास भारत बलाढ्य अशा जपान व जर्मनीलाही मागे टाकू शकतो. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती सहकारी बँकेची ६२ वी सर्वसाधारण सभा
बारामती सहकारी बँकेच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील प्रतिपादन केले. (Baramati News) यावेळी बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष किशोर मेहता, संचालक रवींद्र बनकर, तैनूर शेख, करीम बागवान, संभाजी माने, ज्ञानदेव बुरुंगले, बाबूराव कारंडे, अँड. प्रभाकर बर्डे, सूर्यकांत गादीया आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, अनेक जिल्हा सहकारी बँकात कर्ज देताना कठोर भूमिका न घेतल्याने बँका अडचणीत आल्या आहेत, वन टाईम सेटलमेंट सर्वच प्रकरणात करणे शक्य नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. (Baramati News) रिझर्व्ह बँकेकडून नागरी सहकारी बँकांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत तसेच रिझर्व्ह बँकेकडून सर्वच व्यवहारांवर कडक नजर ठेवली जात आहे. त्या मुळे या पुढील काळात सर्वच बँकांना आर्थिक शिस्त पाळावीच लागणार आहे.
दरम्यान, बारामती बँकेने एनपीए तीन टक्क्यांच्या आत व पुढील सभेपर्यंत शून्य टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना पवार यांनी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना दिली. (Baramati News) पुढील सभेत दोन आकडी लाभांश देणार असाल तरच सभेला येईन, असेही अजित पवार यांनी नमूद केले. कर्मचा-यांनी बदलीसाठी दबाव आणू नये, अन्यथा ज्या गावात शाखा होतील, तेथील कर्मचारी भरती केली जाईल, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना सचिन सातव म्हणाले की, बारामती बँकेचा एनपीए १४.८५ टक्क्यांवरुन ७.६५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. डिसेंबरपर्यत हा एनपीए तीन टक्क्यांवर आणू, पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत हाच एनपीए शून्य टक्क्यांवर आणला जाईल. तसेच बँकेला ८.४५ कोटींचा नफा झाला असून ठेवी २३८४ कोटी तर कर्जे १४०५ कोटींवर गेला आहे. असे सातव यांनी सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : डोर्लेवाडी परिसरात आयडिया नेटवर्क ‘नॉट रिचेबल’