Banking Holidays News : मुंबई : जून महिन्यात आपली बँकेत काही महत्वाचे काम असेल तर मग ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने जून 2023 मधील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जूनमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. जून महिना सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. जर तुम्हाला बँकेशी संबंधित काम करायचे असेल तर ते लवकर करुन घ्या. कारण नंतर सुट्ट्यांमुळे तुमची कामं अडकू शकतात. जाणून घेऊया कोणत्या दिवशी बँका बंद राहतील. (Banks closed for 12 days in June)
वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण आणि महत्त्वाच्या वर्धापनदिनांच्या आधारे या सुट्ट्या काळजीपूर्वक ठरवल्या जातात. जून महिन्यातील प्रथागत शनिवार व रविवार व्यतिरिक्त, अनेक राज्यांमध्ये रथयात्रा, खर्ची पूजा आणि ईद उल अजहा या सणांमुळे बँका बंद राहतील. परिणामी, जून 2023 मध्ये एकूण 12 बँक सुट्ट्या नियोजित करण्यात आल्या आहेत. (Banking Holidays News)
पहा सुट्यांची यादी
जून 2023 मध्ये इतके दिवस बँका बंद राहतील-
4 जून – हा दिवस रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल.
10 जून- या दिवशी महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.
11 जून- या दिवशी रविवार असल्यामुळे सुट्टी असेल.
15 जून – हा दिवस रज संक्रांती आहे, त्यामुळे मिझोराम आणि ओडिशामध्ये बँका बंद राहतील.
18 जून- या दिवशी रविवारची सुट्टी असेल.
20 जून- या दिवशी रथयात्रा निघणार असल्याने ओडिशा आणि मणिपूरच्या बँका बंद राहतील.
24 जून- हा दिवस जूनचा शेवटचा आणि चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
25 जून- जूनला बँकांमध्ये रविवारची सुट्टी असेल
26 जून- खर्ची पूजेमुळे या दिवशी फक्त त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील.
28 जून- महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि केरळमध्ये ईद उल अजहानिमित्त बँका बंद राहतील.
29 जून- ईद-उल-अजहानिमित्त देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
30 जून – मिझोराम आणि ओडिशातील बँका ईद-उल-अझाच्या सुट्टीमुळे बंद राहतील.
आरबीआयच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, विविध राज्यांतील सण, शनिवार आणि रविवार पाहता बँकांना एकूण 12 दिवस सुट्या आहेत. (Banking Holiday’s News) यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News | ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर यांचे निधन…!